Pune News : महापालिका प्रशासन, सत्ताधारी पक्ष काेराेनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ; दीपाली धुमाळ यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष काेराेनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केला.

पुणे शहरात दैनंदिन 6 ते 7 हजार काेराेनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. मागील वर्षी मार्च 2020 मध्ये काेराेनाने पुणे शहरात प्रवेश केला हाेता. तदनंतर शासनाच्या आदेशानुसार 3 महिने संचारबंदी करण्यात आली हाेती. यावेळी महापालिकेने सीसीसी सेंटर व मनपाची रुग्णालये सक्षम करणेसाठी प्रयत्न चालू केले हाेते.

_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिकेच्या स्वॅब सेंटरमधून प्रतिदिनी हजाराे रुग्णांचे स्वॅब घेतले जात असून याचे रिपाेर्ट चार ते पाच दिवसानंतर मिळतात ही अत्यंत गंभीर असून ताेपर्यंत सदर रूग्ण अनेकांना बाधित करताे, त्यांचे पूर्ण कुटुंंब बाधित हाेते, यामुळे देखील रुग्णांची संख्या वाढते. याध्ये लक्ष घालून तातडीने काम करणारी यंत्रणा उभी करण्यात यावी.

पुणे महापालिकेने काेराेनाचे रुग्ण वाढल्यानंतर खाजगी रूग्णालयातील 80 टक्के बेडस ताब्यात घेतले असे जाहिर केले असून प्रत्यक्षात यावर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड हेळसांड हाेत आहे. महापालिकेकडून पूर्वी महापालिकेचे अधिकारी खाजगी रुग्णालयावर नेण्यात आले हाेते, त्यांचेकडून देखील कामकाज हाेत नाही, त्यांना कामाची काेणतीही माहिती नसते. महापालिकेने रुग्णांना बेड्स उपलब्ध करणेसाठी वाॅर रूम तयार केली असून त्याचे नंबर प्रसिद्ध केलेले आहेत. यावर नागरिकांनी संपर्क केला असता त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जात नाही. ऑनलाईन डॅशबाेर्डवर जागा रिक्त दिसतात, परंतू प्रत्यक्षात रुग्णालयात जागा मिळत नाही ही वस्तुस्थिती असून हा डॅशबाेर्ड देखील वेळाेवेळी अपडेट करणे अत्यंत गरजेचे असताना या कामकाजावर नियंत्रण राहिलेेले नाही. सत्ताधारी पक्षाचे नेत्यांना या सर्व बाबी माहित असून सत्ताधारी पक्षाचा प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही.

आम्ही आपणाकडे तसेच आयुक्तांकडे काेराेना विषयी सर्व पक्षीय नेत्यांची आढावा बैठक घ्या म्हणून वेळाेवेळी मागणी करीत असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असे निष्पन्न हाेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.