Pune News : महापालिकेची बंद पडलेली आरोग्य केंद्रे पुन्हा सुरू होणार

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीचा कहर वाढल्यानंतर जम्बो कोविड केअर सेंटरसह शहरामध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश कोविड सेंटर बंद केले जात आहे. त्यानंतर आता शहरातील बंद पडलेली आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

या संदर्भात पुणे महापालिकेेचे आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती म्हणाले, येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या हद्दीतील कोविड केअर सेंटर बंद करत आहोत. परंतु नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी पुर्वी बंद पडलेली आरोग्य केंद्रे पुन्हा नव्याने सुरू करणार आहोत.

पहिल्या टप्प्यात 12 आरोग्य केंद्र सुरू केली आहेत. त्यासाठी कंत्राटी पद्धतीवर डॉक्टर, परिचारीका व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणेकरून भविष्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आलीच तर त्यावेळी आरोग्य केंद्रांमध्ये औषधोपचार देता येऊ शकेल.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या विविध विभागातील मनुष्यबळ ज्या त्या विभागात पुन्हा रूजू करत आहोत. 3 हजार 500 अधिकारी व कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून कोविड योद्धे म्हणून काम करत होेते. त्यापैकी 80 टक्के स्टाफ पुन्हा त्यांच्या मूळ विभागात रूजू झाले आहेत.

उर्वरीत स्टाफ देखील येत्या काही दिवसांमध्ये रुजू होतील, असेही डॉ.भारती यांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.