Pune News : महापालिका आयुक्तांचे सन 2021-22 वर्षांसाठी 7650 कोटीचे अंदाजपत्रक सादर

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या आगामी 2021-22 आर्थिक वर्षासाठी 7650 कोटींचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना मान्यतेसाठी सादर केला.

पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना पालिकेने मात्र अंदाजपत्रकात कोटीचाकोटी उड्डाणे घेतली आहेत. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यांचे पाहिले अंदाजपत्रक सादर केले. सन 2021-22 च्या आर्थिक वर्षासाठी तब्बल 7 हजार 650 कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. गेल्या तीन चार वर्षांत उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढविण्यात अपयश आलेले असतानाही आयुक्तांकडून मात्र कोणतेही पर्याय न देता अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे.

शहरातील पायाभूत सुविधा वाढविणे, शहरातील सर्वात महत्त्वाचे प्रमुख 20 रस्ते पीपीपी मॉडेलद्वारे विकसित करणे, येरवडा येथे वाहतूक उद्यान उभारणे, घनकचरा, पाणी पुरवठा, इलेक्ट्रिक बस खरेदी करणे, सार्वजनिक सुविधा विकसित करणे, दहा किलोमीटरचे सायकल ट्रॅक तयार करणे यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतच शहराच्या भोवतीने नव्याने तीन टिपी स्कीम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच 11 गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. नदी सुधार प्रकल्पावर विशेष भर देण्यात येणार असून त्यासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

उत्पन्नाचा भार मिळकत कर वसुलीवर आहे. मिळकत कर 2356 कोटी, जीएसटीमधून दोन हजार कोटी, बांधकाम परवान्यातून 980 कोटी आणि पाणीपट्टीतून 500 कोटी रुपयांचे ठळक उत्पन्न अपेक्षित असल्याचे मत आयुक्त कुमार यांनी व्यक्त केले.

आयुक्तांच्या अंदाजपत्रकातील ठळक वैशिष्ट्ये :
* मुळा मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत जायका प्रकल्पातंर्गत जलशुद्धीकरण केंद्र उभारणार

* भारतरत्न अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी ; जूनपासून प्रवेश प्रक्रिया

* झोपडपट्टीमुक्त शहरासाठी पंतप्रधान आवास योजना पीपीपी तत्त्वावर राबविणार

* रोजगार निर्मितीसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणार

* टेक स्टॅर्टअप पार्क उभारणीसाठी निधी

*नियमित कर भरणाऱ्यांसाठी ‘लॉयल्टी स्कीम’आणणार

*नवीन लाईट हाऊस तयार करणे, डिजिटल लिटरसीवर भर देणार

*सीएसआरच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण सुविधा सुधारणार तसेच आणखी नावीन्य आणणार

*सीएसआरच्या माध्यमातून नवीन लाईट हाऊस तयार करणे, डिजिटल लिटरसीवर भर देणार

*राजीव गांधी प्राणी संग्रहालयात भव्य मत्स्यालय उभारणार (फिश ॲक्वेरियम)

*आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानावर आधारीत डेटा कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर उभारणार

*पंतप्रधान आवास योजनेतून पीपीपी तत्त्वावर 15 हजार सदनिका उभारणार

*ई चार्जिंग सेंटरची उभारणी करणार

*पर्वती पायथ्यावर पेशवे शिल्पसृष्ठी उभारणार

*23 गावांतील मोकळ्या जागा (ॲमेनिटी स्पेस) 30 वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न वाढविणार

*पीएमपीएमएलसाठी 500 इलेक्ट्रिक बसची खरेदी

*पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर ई – बाईक सुरू करणार

* पुणे महापालिकेच्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने 50 टक्के इलेक्ट्रिक गाड्या वापरणार

*मिळकतकरात 11 टक्के करवाढीचा प्रस्ताव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.