Pune News : महापालिकेत दुखवट्यामुळे दुपारनंतर कामकाज बंद !

एमपीसी न्यूज : औंध बोपोडी प्रभाग 8 अ चे विद्यमान नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचे दु:खद निधन झाले. त्यामुळे दुखवटा जाहीर करत पुणे महापालिकेचे कामकाज दुपारी 2.30 नंतर पुर्णत: बंद ठेवण्यात आले.

दिवंगत नगरसेवक शेवाळे हे क्रीडा समितीसह अनेक समित्यांवर काम केले होते. माजी महापौर सुरेश शेवाळे यांचे ते बंधू होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार प्रथेनुसार विद्यमान नगरसेवकाचे निधन झाल्यास प्रशासकीय कामकाज बंद ठेवले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.