Pune News : महापालिकेने घेतली आरक्षण सोडतीची रंगीत तालिम

एमपीसी न्यूज – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या तयारीला आता वेग येऊ लागला आहे. या अंतर्गतच पुणे महापालितेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीच्या अनुसुचीत जाती (महिला), अनूसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या आरक्षणाची सोडतची रंगीत तालीम सोमवारी झाली.

 

गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या रंगीत तालमीच्या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे उपस्थित होते. त्याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती सुषमा चव्हाण, उप आयुक्त (निवडणूक) यशवंत माने, महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर, ई प्रशासन (सांख्यिकी व संगणक) राहुल जगताप, सुरक्षा अधिकारी राकेश विटकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपसिथत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.