Pune News : कोरोना लसीकरीता कोल्ड स्टोअरेज कंपन्यांशी महापालिकेची चर्चा

एमपीसी न्यूज : कोरोनावरील पहिली लस दृष्टीक्षेपात येताच विविध शहरांमध्ये कोल्ड स्टोरेजची सुविधा करण्यात येत आहे. पुणे महापालिका प्रशासनाकडूनही कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. पुणे शहराच्या आसपासच्या औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या कोल्ड स्टोअरेज कंपन्यांशी महापालिकेची चर्चा सुरु आहे. चार कंपन्यांनी लसीच्या स्टोअरेजसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नवीन कोल्ड स्टोअरेज उभारण्यापेक्षा कंपन्यांचे स्टोअरेज वापरण्याचा खर्च कमी येणार आहे. पुणे महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र कोल्ड स्टोरेज यंत्रणा उभारणीची चाचपणी केली होती. कोरोना कोल्ड स्टोरेजसाठी स्वतंत्र यंत्रणा ही खर्चिक बाब आहे.

त्याची देखभाल दुरुस्तीही महाग असून त्यानंतर कायमस्वरुपी त्याची गरज राहणार नाही. त्यामुळे हा खर्च न करता पालिकेने शहराच्या परिसरातील कोल्ड स्टोरेज लस साठवणुकीसाठी भाडेकराराने घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.