Pune News : पालिकेने कारवाई करत केले 87 किलो प्लास्टिक जप्त, व्यापाऱ्यांकडून 47 हजार 700 रुपये दंड वसूल 

एमपीसी न्यूज – कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2021 अन्वये प्रभाग क्रं. 12 डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण हजेरी कोठी अंतर्गत” स्वच्छतेपासून मुक्तता तसेच प्लॅस्टिक मुक्त पुणे शहर जनजागृती अभियान राबविले.

या अभियानाच्या दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत 87 किलो प्लास्टिक जप्त करत व्यापाऱ्यांकडून 47 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला. यात कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानपालिका आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्लास्टिक मुक्त अभियानात प्लॅस्टिक मुक्त पुणे शहर करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर व्यापारी संघटनेचे कोथरूड विभागाचे अध्यक्ष शशिकांत उभे व अन्य त्यांचे सहकारी पदाधिकारी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, पथारीवाले व नागरिक जनजागृती कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

सदर अभियानात “कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, प्लॅस्टिकचा भस्मासूर करील पृथ्वीचा विनाश, प्लॉस्टिकचा वापर टाळा वन्य व प्राण जीवनाची हानी टाळा, प्लॉस्टिक घालवा पृथ्वी वाचवा,” अशाप्रकारचे प्लॅस्टिक मुक्तीचे फलक हातात घेऊन डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगर, कोथरूड गावठाण, मंत्री पार्क, बधाई चौक, भेलके नगर चौक, कुर्वे पुतळा चौक, शिवाजी पुतळा चौक, तेजस नगर परिसरात जनजागृती करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.