Pune News : स्वतःचे ओळखपत्र नसणाऱ्या नागरिकांच्या लसीकरांसाठी पालिकेने उचलय हे पाऊल

एमपीसी न्यूज – शहरातील जे रहिवासी लसीकरणासाठी पात्र आहेत. मात्र त्यांच्याकडे स्वतःचे ओळखपत्र नसल्याने ते लसीकरण पासून वंचित राहिले आहेत. अशा सर्व 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी पालिकेने विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी काढले.

शहरामध्ये कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे.

मात्र ज्याच्याकडे स्वतःचे ओळखपत्र, फोन नंबर व इतर सरकारी कागदपत्रांसारखे वैध दस्तऐवज नाही अशा नागरिकांना लस मिळण्यास अडचणी येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाज, किन्नर समाज, भटके समाज, साधूसंत, विविध धर्मांचे महंत, मनोरुग्ण, मनोविकास रुग्णालयातील बांधव, वृद्धाश्रमातील नागरिक, रोडवर भिक मागणारा समाज, सुधारणा गृहातिला शिबिरात राहणारे व्यक्ती व यासारखे इतर व्यक्ती ज्यांचे वय लसीकरणासाठी पात्र आहेत परंतु स्वतःचे ओळखपत्र नसणाऱ्या व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी महापलिकने मुख्य समाज विकास अधिकारी रामदास रायाजी चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे.

चव्हाण हे ओळखपत्र नसणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्याकरिता आरोग्य विभागाकडील लसीकरण नोडल ऑफिसर यांचेशी समन्वय साधून अशा लोकांकरिता लसीकरण सत्र आयोजित करण्याचे काम करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.