Pune News : पुण्यातील पूरस्थितीला महापालिका जबाबदार – उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसीन्यूज : पावसाबाबत महापालिकेने काम करायला हवं होतं. पण काम झालेले दिसत नाही. पुण्यातील पूरस्थितीला महापालिका जबाबदार आहे. नाल्यांना वॉल का बांधली नाही, काम का झालं नाही, याबाबत आढावा बैठक घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठरावीक निकषापेक्षा जास्त मदत द्यावी लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा केला जाईल. आयएमडीचा अंदाज खरा ठरला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वांना सर्व मदत दिली जाईल. तसेच पंढरपूर घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.

पवार पुढे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून त्याला केंद्राचे काही नियम आहेत. त्यामुळे यात बाधीत लोकांना मदत राज्य सरकार देईलच, पण केंद्रानेही मदत केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

जलयुक्त शिवारची कॅग अहवालानुसार चौकशी सुरू आहे. त्यांच्याच काळात हा आवहाल आला होता असे सांगत शिवेंद्रसिंहराजे विकास कामासाठी भेटून गेले. अशा भेटी होत राहतात, त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. त्यात काही काळेबेरे नाही, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.