Pune News : गृह विलीगिकरणातील कोरोना बधितांवर आता अ‍ॅप द्वारे पालिकेची नजर

एमपीसी न्यूज – शहरात तब्बल 50 हजार कोरोना बधित गृह विलीगिकरणात राहून इलाज घेत आहेत. या बधितांना वर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅप मुळे कोरोना रुग्ण घराबाहेर पडला तरी महापालिकेला समजणार असून रुग्णाची ऑक्सिजन पातळी, ताप आदीची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला समजणार त्यानुसार उपचार व मार्गदर्शन करणे सोपे होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला आहे. सध्या शहरात 54 हजार ऍक्टिव्ह रुग्ण असून यापैकी सौम्य लक्षणे असलेले 50 हजार रुग्ण गृह विलगिकरणात (होम आयसोलेशन) आहेत. यामध्ये काही कुटुंबच्या कुटुंब आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या असल्याने त्यांना मोनेटरिंग करणे अवघड जात आहे.

तसेच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना तातडीने उपचार मिळणे अवघड झाले आहे.

यापार्श्वभूमीवर महापालिकेने होम आयसोलेशन रुग्णांचे मोनेटरिंग करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे उद्या उद्घाटन करण्यात येणार आहे. होम आयसोलेशन मध्ये राहणाऱ्या रुग्णांना मोबाईल वर हे अ‍ॅप डाउनलोड करणे बंधनकारक राहणार आहे. या अ‍ॅपमध्ये रुग्णाने त्याची ऑक्सिजन पातळी, तापमान व अन्य काही त्रास होत असेल त्याची नोंद रुग्णांने अथवा त्याच्या नातेवाईकाने करणे बंधनकारक राहणार आहे.

रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे अथवा ताप व अन्य लक्षणे दिसल्यास महापालिकेच्या डॅशबोर्ड वर समजणार आहे. तसेच हे अ‍ॅप डाऊनलोड केलेला हा मोबाईल रुग्णासोबत ठेवणे बंधनकारक राहणार आहे. कोरोना रुग्ण बाहेर गेल्यास त्याचीही माहिती डॅशबोर्ड वर दिसणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.