Pune News : पीएमपीएमएलसाठी महापालिकेकडून 13 कोटींच्या 50 सीएनजी बसेसची खरेदी

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेकडून आता भाडेतत्वावर नाही तर 13 कोटींच्या 50 सीएनजी बस पीएमपीएलसाठी खरेदी करणार आहे. महापालिका स्थायी समितीने हा निर्णय घेतला असून 25 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाला मान्यता दिली आहे. या बसमधून पुणेकरांना शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागात 10 रुपयांमध्ये दिवसभर प्रवास करता येऊ शकणार आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी शहरातील पेठांमधील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना आणली होती. गर्दीच्या भागात नागरिकांना स्वत:मध्ये प्रवास करता यावा यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. सुरुवातीला भाडेतत्वावर बस घेण्याची योजना होती मात्र महापालिका आता या बस स्वत: विकत घेणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या बस असल्यामुळे कोणतेही भाडे द्यावे लागणार नाही. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

या खरेदीविषयी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, शहरातील गर्दीच्या भागात नागरिकांना स्वस्तात प्रवास करता यावा. तसेच या भागातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यादृष्टीने ही योजना आणण्यात आली होती. यासाठी सुरुवातीला इलेक्ट्रीक बस खरेदीचा विचार होता. परंतु 1 एप्रिल 2020 पासून ही योजना सुुरु करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाची साथ आल्यामुळे ही योजना सुरु होऊ शकली नाही. स्थायी समितीने आता भाडेतत्वावर नाही तर स्वत: सीएनजी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 13 कोटींच्या 50 सीएनजी बस खरेदी करण्यात येणार आहेत. याचा फायदा शहरातील ज्येष्ठांसह सर्व नागरिकांना होणार आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाने शहरातील मध्यवर्ती भागातील 9 मार्गांवर 5 रुपयात 5 किलोमीटर ही योजना सुरु केली आहे. महापालिकेच्या नवीन योजनेनुसार 10 रुपयात दिवसभर प्रवास करता येणार आहे. महापालिका बस खरेदी केल्यानंतर पीएमपीएमएलला देणार असून याचे संचलन पीएमपीएमएल करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1