-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : पालिकेने शहरातील ड्रेनेजच्या खोदाईची कामे थांबवली

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – शहरातील प्रमुख रस्त्यांवर नवीन ड्रेनेज लाईन टाकण्साठी सुरु असलेली खोदाईची कामे शुक्रवारी सायंकाळपासून बंद करण्यात आली असून सर्व रस्ते मंगळवारपर्यंत दुरुस्त करून पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

शहरातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मुख्य रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज आणि पाणीपुरवठा विभागाची कामे सुरू आहेत. लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील पाणीपुरवठा विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, खोदकामामुळे खराब झालेला रस्त्याचा भाग दुरूस्त करणे बाकी आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

तर इतर रस्त्यांवर ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे सुरू आहेत. खोदाईची कामे 10 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र कामे पूर्ण झाली नाहीत. त्यातच केल्याने पाऊस पडल्याने सर्व रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आणि दुसरीकडे लॉकडाऊन शिथील केल्याने रस्त्यावर नागरिकांची आणि वाहनांची गर्दी वाढल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला.

रस्ते खोदाईच्या कामांमुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवरही चहूबाजूंनी टिकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर ड्रेनेजसाठी सुरू असलेली खोदाई शुक्रवारी सायंकाळी थांबवण्यात आली. जेवढे खोदकाम झाले आहे, तेवढी पाईपलाईन टाकून जुन्या आणि नव्या पाईपलाईनची जोड करून रस्ते मंगळवारपर्यंत पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय रस्ते योग्य प्रकारे पूर्ववत करून घेण्याची जबाबदारी पथ विभागातील चार अभियंत्यांवर सोपवण्यात आले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्यांवरील सर्व खड्डे पुढील तीन ते चार दिवसात पूर्णपणे बुजववण्याचे काम करण्यात येणार आहे. असे कुलकर्णी यांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.