Pune News : महापालिकेतर्फे दरवर्षी दिला जाणार ‘अटलबिहारी वाजपेयी खेलरत्न पुरस्कार’

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारकडून क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम खेळाडूस ज्याप्रमाणे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, त्याधर्तीवर शहरातील खेळाडूंना ‘अटलबिहारी वाजपेयी खेलरत्न पुरस्कार’ देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला.

_MPC_DIR_MPU_II

केंद्र सरकारच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या धर्तीवर शहरातील खेळाडूंनाही अटलबिहारी वाजपेयी खेलरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात यावे, असा प्रस्ताव नगरसेवक वीरसेन जगताप यांनी स्थायी समितीला दिला होता.

त्याला मंगळवारी झालेल्या स्थायीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ असे असणार आहे. याबाबतची रक्कम व निकष निश्चित करण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.