Pune News: जम्बो कोविड रुग्णालयासाठी महापालिका 75 कोटी रुपये निधी देणार

Pune News: Municipal Corporation to provide Rs 75 crore for Jumbo Covid Hospital ठेकेदाराला आगाऊ रक्कम देण्यासाठी महापालिकेतर्फे 50 कोटी रुपये निधी 'पीएमआरडीए'कडे वर्ग करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आज ठेवण्यात आला होता.

एमपीसी न्यूज – राज्य शासनातर्फे उभारण्यात येणाऱ्या जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी पुणे महापालिकेतर्फे 75 कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येणाऱ्या या जम्बो कोविड हॉस्पिटल उभारणीची जबाबदारी ‘पीएमआरडीए’कडे देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 260 कोटी रुपये खर्च येणार आहे. दोन्ही महापालिका त्यासाठी 25 टक्के निधी देणार आहे.

पुण्यातील सीओईपी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या या हॉस्पिटलचे कामही सुरू झाले आहे. ठेकेदाराला आगाऊ रक्कम देण्यासाठी महापालिकेतर्फे 50 कोटी रुपये निधी ‘पीएमआरडीए’कडे वर्ग करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आज ठेवण्यात आला होता.

कोविड हॉस्पिटलसाठी आवश्यक साधनसामुग्री, प्रयोगशाळा, तपासण्या, औषधे, एक्स रे, कपडे अशा विविध बाबींसाठी 25 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आल्याचे हेमंत रासने यांनी यावेळी सांगितले. तर, कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी आणखी 1 लाख अँटीजेन किटस खरेदी करण्यात येणार आहे.

त्यालाही स्थायी समितीने मान्यता दिली आहे. केवळ अर्ध्या तासात कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह या किटद्वारे समजते. 4 कोटी 59 लाख रुपये त्यासाठी खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.