Pune News : शहरातील प्रमुख स्मशानभूमींमध्ये 13 ठिकाणी पालिका बसवणार हायब्रिड दाहिनी

एमपीसी न्यूज – शहरातील प्रमुख स्मशाभूमींमध्ये 13 ठिकाणी हायब्रिड दाहिन्या बसविण्यात येणार आहेत. शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महापालिकेस 15 व्या वित्त आयोगांतर्गत निधी प्राप्त झाला आहे. यातून प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एसपीसी) उभारली जाणार आहे.

शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून स्मशानभूमीतील यंत्रणेत मोठे बदल केले जात आहेत. त्या अंतर्गत विविध उपकरणे वापरण्यात येत आहेत. त्यानंतर आता आणखी 13 स्मशानभूमीत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा म्हणजे APC सिस्टीम बसवणार आहे.

या यंत्रणेद्वारे धुरातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी केले जाते. तर ठिकाणी हायब्रिड म्हणजे विद्युत आणि गॅस दाहिन्यादेखील बसवल्या जाणार आहेत. यासाठी प्रत्येकी 60-65 लाख रुपयांचा खर्च येईल. लवकरच ही प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.

महापालिकेस नुकताच 217 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यात शहराची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 134 कोटी, तर घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज सुधारणा तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित कामासाठी 83 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मिळालेल्या निधीतून ही कामे केली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.