Pune News : काम चुकारांना कर्मचार्‍यांचे महापालिका करणार ‘ट्रॅकींग’

एमपीसी न्यूज – मनुष्यबळ वापराचे सुयोग्य व्यवस्थापन आणि काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅकिंग करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान हे ट्रॅकिंग प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे.

महापालिकेचे सुमारे 18 हजार अधिकारी आणि कर्मचारी आहेत. वर्ग 1 ते 3 च्या कर्मचाऱ्यांपेक्षा वर्ग चार अर्थात प्रत्यक्षात फिल्डवर सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या प्रचंड मोठी आहे. यामध्ये पालिकेच्या सेवेतील कायम सेवकांसोबतच ठेकेदारकडील सेवकांची संख्याही मोठी आहे. यामध्ये सफाई सेवक, पाणी पुरवठा, वाहन चालक यासह विविध विभागात काम करणार्‍यांचा समावेश आहे. दैनंदिन कामात एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन करणे जिकरीचेच काम आहे. मात्र, मोठयाप्रमाणावर मनुष्यबळ असले तरी दैनंदिन कामातील तक्रारिंचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

यापार्श्वभूमीवर प्रशासनाने उपलब्ध मनुष्यबळाचा सुनियोजित वापर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचे ठरवले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक कर्मचार्‍याचे ट्रॅकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक कर्मचार्‍याच्या मनगटावर कामावर असताना जीपीएस सारख्या प्रणालीचा वापर केले पट्टा (बँड) बांधण्यात येणार आहे. कर्मचारी नेमक, कुठे काम करत आहे, अथवा कोठे गेला आहे याची माहिती नियंत्रण कक्षात बसून मिळणार आहे.

यापुर्वी असा प्रयोग करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र तांत्रिक अडचणी अंमलबजावणी होऊ शकली नाही. मागील काही वर्षात तंत्रज्ञान बदलले आहे, त्यामुळे अडचणी येणार नाहीत, असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.