-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : थकित ‘पाणीपट्टी’ वसुलीकडे पालिकेने वळवला मोर्चा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना मिळकतकर विभागा बरोबर आता पाणी पुरवठा विभागानेही अखेरच्या टप्प्यात थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगरणार आहे. यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

शहरात नागरिकांसोबतच सर्व सरकारी कार्यालये आणि व्यावसायीक आस्थापनांना महापालिकेकडून पाणी पुरवठा होता.

सरकारी कार्यालये आणि व्यावसायीकांना मीटरने पाणी पुरवठा करण्यात येतो. या व्यावसायीकांची थकबाकीही मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे उत्पन्न घटल्याने पाणी पुरवठा विभागानेही थकबाकीसाठी कंबर कसली. अगदी मार्चमध्ये मोठ्या आस्थापना त्यामध्ये सरकारी कार्यालये, हॉटेल्स आणि खाजगी कार्यालयांकडील थकबाकीकडे मोर्चा वळवणार आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

शहरात 35 हजार मिळकतींना मिटरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. यातील बहुतांश मिळकती या व्यावसायिक वापरांच्या आहेत. या मिळकतधारकांकडे सुमारे 170 कोटी रुपये थकबाकी आहे. प्रामुख्याने नादुरूस्त मिटर, मिळकतींची मालकी बदलल्याने निर्माण होणार्‍या तांत्रिक अडचणी, दुबार बिले, चुकीची बिले तसेच सरकारी कार्यालयांना होणार्‍या पाणी पुरवठ्याची सर्वाधिक थकबाकी आहे.

यापैकी काहीजण न्यायालयात गेले असून काही प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने सोडविण्यात आली आहेत. तर 700 हून अधिक असे मोठे थकबाकीदार आहेत की त्यांच्याकडून वसुलीसाठी कुठलिही अडचण नाही. पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडून थकबाकी वसुली करण्यात येईल.

यासोबतच ज्यांचे मिटर नादुरूस्त आहेत, त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने मीटर लावून दोन महिन्यातील पाणी वापरानुसार सरासरी थकबाकीची रक्कम ठरविण्यात येणार आहे. लोक अदालतीमध्ये तडजोड केल्यानंतरही थकबाकी न भरणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम जोरदारपणे राबवून अधिकाअधिक थकबाकी वसुली करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे रुबल अग्रवाल यांनी नमूद केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.