Pune News : नव्याने समाविष्ट गावातील तब्बल 5 कोटींची थकीत बिले पालिकेला भरावी लागणार

एमपीसी न्यूज – नव्याने समाविष्ट 23 गावांच्या रस्त्यावरील पथदिवे, शाळा, कार्यालये अशा 310 वीजमीटर्ससाठी सुमारे 4 कोटी 27 लाख 28 हजार रुपयांची वीजबिलाची थकबाकी आहे, तर पाणीपुरवठा करण्यासाठी वापर येणार्‍या विजेची 72 लाख 1 हजार रुपयांची थकबाकी आहे.आशा तब्बल 5 कोटींची बिले पालिकेला भरावी लागणार आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांमधील पथदिवे (स्ट्रीट लाइट), पाणीपुरवठा तसेच गावांमध्ये असलेल्या शाळा, सरकारी कार्यालयांची थकीत वीज बिले भरण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेने दिले आहे.

समाविष्ट गावामधील रस्त्यावरील पथदिवे (स्ट्रीट लाइट), पाणीपुरवठा तसेच गावांमध्ये असलेल्या शाळा, सरकारी कार्यालयांसाठी विजेचा वापर झाला आहेत. त्याचे वीजबिल अद्याप थकीत आहे. ही थकबाकी सर्व गावांची मिळून पाच कोटीपेक्षा अधीक आहे. गावे पालिका हद्दीत आल्याने गावांची थकबाकी कोणी भरायची, यावरून पेच निर्माण झाला आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेने स्पष्टीकरण देऊन बाजू मांडली आहे. महापालिकेला 23 ग्रामपंचायतींच्या खात्यावर असलेल्या सर्व रकमा मिळणार आहेत. याशिवाय गायरान जमिनी, ऍमिनिटी स्पेसदेखील उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांकडून कर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेवर या गावांच्या थकबाकी अदा करण्याची जबाबदारी राहील, असे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.