Pune News : सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात महापालिकेची मुख्य सभा तहकूब !

 पूरसदृश्य परिस्थितीत कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन होत नसल्याचा सदस्यांनी केला आरोप

एमपीसी न्यूज : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नाही. वॉर्ड ऑफिसकडून आवश्यक मनुष्यबळाअभावी सांडपाणी व्यवस्थापन होत नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने खुलासा द्यावा, अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केली. यावेळी अभूतपूर्व गोंधळात मुख्य सभा तहकूब करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

रिपाइंचे नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, भाजप नगरसेवक आदित्य माळवे, अविनाश बागवे, पठाण यांच्यासह अन्य नगसेवकांनी एकाच वेळी मागणी केली. कोरोनाकाळात साथीचे रोग पसरण्याची भिती व्यक्त करत महापालिकेने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी सदस्यांकडून करण्यात आली.

परंतु, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याकडे दूर्लक्ष करत मृत्यूमुखी पडलेल्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीप्रती श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.