Pune News : महापालिकेचे स्थायीचे बजेट होणार एक मार्चला सादर!

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक (बजेट) येत्या सोमवारी (दि. 1) स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे ऑनलाईन सर्वसाधारण सभेत सादर करणार आहेत.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आगामी आर्थिक वर्षासाठी 7 हजार 650 कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. त्यामुळे स्थायी समितीकडून त्यामध्ये भर घालत किती कोटीचे बजेट सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

आयुक्त कुमार यांनी उत्पन्न वाढीसाठी मिळकत करात 11 टक्के वाढ सुचवली होती. पण ही वाढ स्थायी समितीने फेटाळली आहे. याउलट प्रामाणिकपणे मिळकत कर भरणा करणाऱ्या पुणेकरांना करात 15 टक्के सुट दिली आहे. त्यामुळे आयुक्तांनी अपेक्षित धरलेल्या उत्पन्न्नात घट होणार आहे. त्यातच स यादी आणि नवीन योजनासाठी साधारणपणे 1 हजार कोटीची वाढ होणार आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची आकड्याचे गणित जुळविताना कसरत होणार आहे. स्थायी समिती किती कोटीचे बजेट सादर करणार याकडे लक्ष लागले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट दिसून येणार हे नक्की. उत्पन्न वाढीसाठी नव्या उपाययोजनांसह रखडलेली मेट्रो, नदी सुधार प्रकल्पासाठीचे जायका प्रकल्प, स्मार्ट सिटी, पीएमपीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधार, सातव्या वेतन आयोगाची फरकासह अंमलबजावणी, रखडलेली विकासकामे, पूर्वीच्या 11 समाविष्ट गावांसह नव्याने समाविष्ट 23 गावांमधील विकासकामे यांसह अनेक प्रकल्प, योजनांचा समावेश अंदाजपत्रकात असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.