Pune News : महापालिका, मेट्रोचा त्रास; मंडईमधील गाळेधारक करणार आंदोलन

एमपीसी न्यूज : भाजीपाला, फळ, पान, तरकारी, पूजा साहित्य व भुसारी विक्रेत्यांवर पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व मंडई येथील सर्व विक्रेते येत्या 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.

मंडई येथील व्यावसायिकांवर काही दिवसापासून अन्याय होत असल्याने आज महात्मा फुले मंडई येथील व्यावसायिकांच्या समस्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आल्या.

मेट्रोच्या आराखडानुसार कार्यवाही करावी, येथील व्यापारी जागा द्यायला तयार आहेत, परंतु त्यांचे पहिले पुनर्वसन करावे, अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.

मंडई येथील या मध्यमवर्गीय व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या आंदोलनात सहभागी होणार आहे. तसेच या आंदोलनात येथील स्थानिक व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आहे त्या जागी पुनर्वसन करावे, भाडेवाढ रद्द करावी, गाळे दुरुस्ती करावी, रोज स्वछता व साफसफाई करावी, करारनामा रद्द करावा यासारख्या मागण्या पत्रकार परिषदेत करण्यात आल्या.

यावेळी मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची, वंचित आघाडीचे देखरेख समिती सदस्य अतुल बहुले, शहराध्यक्ष मूनवर कुरेशी, नितीन शेलार, भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुरड्डे, राहुल खोपडे, संतोष कुदळे, कमलेश काची, राजू शहाणे, महेश जाधव तसेच मंडई येथील सर्व व्यावसायिक आणि पदाधिकारी पत्रकार परिषदेत सहभागी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.