Pune News : पालिकेच्या शिक्षकांना ‘कोरोना ड्युटी’तून सुट्टी !

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या कामकाजासाठी नेमलेल्या महापालिकेच्या शिक्षकांना ‘कोरोना ड्युटी’मधून सुट्टी देण्यात आली असून पुन्हा आपापल्या शाळांमध्ये पुर्ववत नेमणूका दिल्या आहेत. परंतु,दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढले आहेत.

शहरात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर महापालिकेला कोरोना कामकाजामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू लागली होती. कोरोना नियंत्रण, विविध कोविड सेंटर, सर्वेक्षण आदी कामांकरिता बालवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स तसेच प्राथमिक विभागाच्या उप शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. पालिकेने तयार केलेल्या विविध पथकांमध्ये या शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता.

सध्या कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. घरोघर सर्वेक्षणाच्या 25 पेक्षा अधिक फेऱ्या झालेल्या असून रुग्णसंख्याही घटली आहे. राज्य शासनाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरु करण्याचे संकेत दिल्याने पालिकेलाही शाळा सुरु करण्याची तयारी करावी लागणार आहे.

शाळा सुरु झाल्यास शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना कोरोना ड्युटीमधून मुक्त करण्याची मागणी शिक्षण विभागाने केली होती. त्यामुळे आता सर्व शिक्षकांची दिवाळी गोड होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.