Pune News : फिरस्त्याचा काठीने मारहाण करून खून,  हद्दीवरून दोन ठाण्यात गुन्ह्याची हेळसांड

एमपीसी न्यूज – शाहीर अमर शेख चौकात पदपथावर मध्यरात्री एका फिरस्त्याच्या डोक्यात काठीने बेदम मारहाणकरून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, अद्याप खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

धक्कादायक म्हणजे, दोन पोलिस ठाण्यात हद्दीच्या वादातून तपास कोणाकडे, यावरून गुन्हा फिरत राहीला होता. पण, वरिष्ठांकडे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याचा तपास फरासखाना पोलिसांनाच करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे.

सिताराम रामकरण (वय ३५, फुटपाथ, मंगळवार पेठ) याला अटक केली आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिताराम रामकरण मुळचा राजस्थान येथील आहे. पुण्यात तो कुटूंबासोबत पदपाथवर राहत होता. तर, मृत व्यक्तीही फिरस्ता होती. तेही याच फुटपाथवर राहत असे. तो रात्री अचानक सिताराम यांच्या झोपडीत शिरत असे, त्या रागातून सिताराम व अल्पवयीन मुलाने त्याला काठीने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार समोर आला. याप्रकरणी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

त्यानंतर हे घटनास्थळ बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्यामुळे गुन्हा बंडगार्डन पोलिसांकडे पाठवण्यात आला. मात्र, बंडगार्डन पोलिसांनी पुन्हा तो फरासखाना पोलिसांकडे पाठवून दिला. त्यानंतर हद्दीचा वाद वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यत गेला. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, शवविच्छेदनात त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर याप्रकरणी लखूनाचा गुन्हा दाख करण्यात आला आहे. फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजीत पाटील, मनोज अभंग व सुशील बोबडे आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करत खूनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. खूनानंतर सिताराम व अल्पवयीन मुलगा पसार झाले होते. त्यांना सूरत येथून पकडण्यात आले आहे. सिताराम याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.