Pune News : “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” अभियानाचा शिवसेनेतर्फे शुभारंभ

"माझे कुटुंब , माझी जबाबदारी" या मोहीमेच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दि. 15 ते 30 सप्टेंबर पर्यंत आरोग्य कर्मचारी आणि महापालिका सेवक घरोघरी जाऊन सर्वांची आरोग्य माहिती व तपासणी करणार

0

एमपीसी न्यूज – कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या अभियानाचा शुभारंभ कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालयामध्ये  करण्यात आला.

अभियानाची सुरुवात शिवसेना गटनेते आणि नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी महानगरपालिका सहआयुक्त संदीप कदम, क्षेत्रीय कार्यालय मुख्य अभियंता प्रसन्न कुलकर्णी, विभागीय आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश साबळे, प्रमोद चव्हाण, सचिन लोहकरे, नवनाथ मोकाशी, गणेश साठे, वैजनाथ गायकवाड, हनुमंत पिगळे, लक्ष्मण काळे, जयंत वानखेडे, प्रशांत खाडे  उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश चौंधे, गणेश घोलप यांनी सहकार्य केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने “माझे कुटुंब , माझी जबाबदारी” या मोहीमेच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 15 ते 30 सप्टेंबर पर्यंत आरोग्य कर्मचारी आणि महापालिका सेवक घरोघरी जाऊन सर्वांची आरोग्य माहिती व तपासणी करणार आहेत.  या मोहिमेची सुरुवात मंगळवारपासून केली आहे. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या घरी येणाऱ्या महापालिका सेवक आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक विशाल धनवडे आणि संजय भोसले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.