Pune News : सायकल कामगार संघाच्या नाम फलकाचे अनावरण

एमपीसी न्यूज – सायकल कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) नाम फलकाचे अनावरण पुणे महापालिकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते करण्यात आले. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनी पुण्यात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा पदाधिकारी अभय वर्तक, अजेंद्र जोशी, सायकल कामगार संघाचे पदाधिकारी प्रभाकर सुर्यवंशी, फरिद शेख, कैलास बारी, सूर्यकांत चव्हाण,  हनुमंत पवार, स्वामी, सलीम शेख, बादशहा शेख आदी उपस्थित होते.

‘संघटनेच्या बोर्डाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, जागृती निर्माण करण्याचे  काम नामफलक करेल,’  असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हा पदाधिकारी सचिन मेंगाळे यांनी केले. रस्ताच्या कडेला बसून सायकल दुरूस्ती, जोडणी करणारे कामगारांच्या जीवनात प्रगती व्हावी,  स्थिरता यावी म्हणून भारतीय मजदूर संघाने पुढाकार घेऊन 1997 साली संघटना स्थापन केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.