Pune News : नाना पटोले महाराष्ट्राचे पप्पू आहेत : चंद्रकांत पाटील

एमपीसीन्यूज : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना डबे नाहीतर इंजिन बदलण्याची गरज आहे अशा शब्दांत केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार यावर टीका केली होती. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. ज्याप्रमाणे केंद्रात एक पप्पू आहे, त्याप्रमाणे नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत, असा टोला पाटील यांनी पाटोळे यांना लगावला आहे.

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावातील नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकारने तेवीस गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय कशाच्या आधारावर घेतला हे अद्याप समजले नाही. परंतु, तरीही त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या 23 गावांच्या विकासासाठी आता राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा निधी पुणे महापालिकेला जावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना एकत्र करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड प्रमाणे तिसरी महापालिका देखील तयार करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.