Pune News : सीए विद्यार्थ्यांसाठी ‘अस्पायर टू इन्सपायर’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

खासदार डॉ. अमोल कोल्हे, नौदल अधिकारी सुनील भोकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

एमपीसी न्यूज: सीए विद्यार्थ्यांसाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय), स्टुडंट स्किल्स एनरीचमेन्ट बोर्ड (बोर्ड ऑफ स्टडीज), आयसीएआय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 8, 9, 10 जानेवारी रोजी आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे ही परिषद प्रत्यक्ष आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.

या परिषदेचे उद्घाटन शुक्रवार (दि. 8) रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेष प्रभू व ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांच्यासह आयएएस अधिकारी सीए संपदा मेहता, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.च्या कार्यकारी संचालक आर. एम. विशाखा यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थांना मिळणार आहे.

या तीन दिवसीय परिषदेत तांत्रिक, प्रेरणादायी, तसेच विशेष सीए अशी सत्रे होणार आहेत. यांमध्ये स्वामी गोविंददेव गिरी महाराज, सीए जय छायरा, सी राजेश शर्मा, सीए दयानिवास शर्मा, सीए प्रमोदकुमार बुब, सीए चंद्रशेखर चितळे, सीए भारत फाटक, डॉ. संजय मालपाणी यांची विशेष व्याख्याने होणार आहेत. विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी www.puneicai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.