Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांचा राजीनामा

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लेखी स्वरूपात त्याबाबतचे निवेदन आमदार तुपे यांनी दिले आहे. गेली अडीच वर्षांपासून आमदार तुपे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत चेतन तुपे निवडून आलेले आहेत. निवडून आल्यानंतर एक पद एक व्यक्ती या पक्षाच्या धोरणानुसार चेतन तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.

मात्र, पक्षाकडूनच त्यांना थांबविण्यात आले होते. त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.