Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे झाडावर बसून आंदोलन;नदी पात्रातील झाडांची कत्तल होऊ नये म्हणून उचलले पाऊल

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या ( Pune News) माध्यमातून नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.या कामामुळे हजारो झाडांची कत्तल होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्ती केली आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यालया बाहेरील झाडावर बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन आंदोलन केले.तर यावेळी भाजप आणि महापालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

 

Pune News : मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून दोघांनी मागितली व्यावसायिकाकडे खंडणी

 

 या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,शहरातील विकास कामांना आमचा विरोध नाही.पण विकास काम करीत असताना.पर्यावरणाचा देखील भाजप आणि महापालिका प्रशासनाने विचार केला पाहिजे होता; तो त्यांनी केला नसल्याने आता नदी पात्र सुधार प्रकल्प अंतर्गत हजारो झाडांची कत्तल होणार आहे.

नियमानुसार आम्ही झाड लावणार असल्याचे सांगितले जात आहे.मात्र आजवर महापालिका प्रशासना मार्फत झाडे काढल्यानंतर कोणत्याही ठिकाणी झाडे लावण्यात आली नाहीत. त्यामुळे या नदी पात्रातील झाडांचे देखील तेच होईल.यामुळे झाडांची कत्तल झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेऊ असा इशारा देखील त्यांनी ( Pune News) यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.