Pune News : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील महत्त्वाच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची रविवारी (दि. 4 ऑक्टोबर) नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष व आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे नवनिर्वाचीत युवक पदाधिकारांची निवड करण्यात आली, तसेच त्यांना ही नियुक्तीपत्रक देण्यात आले.

कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराचे प्रभारी विशाल काळभोर, पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, शिक्षण मडांळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, , महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस समिर चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश हांडे, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने ,कार्याध्यक्ष नितीन कळमकर, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनी मानकर उपस्थित होते.

यावेळी सर्व नवनिर्वाचीत युवक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व पुणे शहराचे प्रभारी विशाल काळभोर, कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी मार्गदर्शन केले. फिजीकल डिस्टंसिंग पालन करुन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.