Pune News : नव्या 23 गावांसाठी राष्ट्रवादीची जबाबदारी, समन्वयासाठी पदाधिकारी

एमपीसी न्यूज – पुणे शहरालगतच्या 23 गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारने 30 जून रोजी घेतला आहे.

या गावांच्या महापालिकेत समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, या निर्णयामुळे या गावांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आले आहेत. म्हणजेच, या गावातील लोकप्रतिनिधी आता नव्याने पुणे महानगरपालिकेतील सदस्य असणार आहेत. परंतु, महानगरपालिका निवडणुकीसाठी कालावधी असल्याने आणि विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने येथे प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वयासाठी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात येत आहे.

23 गावांचा महानगरपालिकेत समावेश झाल्याने प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होणार आहे. दैनंदिन कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या संपर्काची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या सभासदांना या 23 गावांच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. येथील प्रशासकीय यंत्रणा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या हे पदाधिकारी जाणून घेणार आहेत. तसेच, प्रशासकीय समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत. नव्याने महानगरपालिकेत समावेश झालेल्या या 23 गावांतील नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला असून, नागरिकांनी या पदाधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे

पदाधिकारी व समन्वयासाठी गावांची नावे

1. मांजरी (बु.) – आमदार चेतन तुपे
2. वाघोली – आमदार सुनील टिंगरे
3. नांदेड – विरोधी पक्षनेत्या सौ. दीपालीताई धुमाळ
4. खडकवासला – नगरसेवक श्री. सचिन दोडके
5. म्हाळुंगे – नगरसेवक श्री. बाबुराव चांदेरे
6. सूस – नगरसेवक श्री. बाबुराव चांदेरे
7. बावधन (बुद्रुक) – नगरसेवक श्री. दीपक मानकर
८. किरकटवाडी – नगरसेविका सौ. सायलीताई वांजळे
9. पिसोळी- नगरसेविका सौ. नंदाताई लोणकर
10. कोपरे – नगरसेवक श्री. सचिन दोडके
11. कोंढवे धावडे – नगरसेवक श्री. दिलीप बराटे
12. नऱ्हे – नगरसेवक श्री. दत्तात्रय धनकवडे
13. होळकरवाडी – नगरसेवक श्री. गणेश ढोरे
14. औताडे-हांडेवाडी – नगरसेवक श्री. गणेश ढोरे
15. वडाचीवाडी – नगरसेवक श्री. योगेश ससाणे
16. शेवाळेवाडी – नगरसेविका सौ. वैशालीताई बनकर
17. नांदोशी – नगरसेवक श्री. दिलीप बराटे
18. सणसनगर – नगरसेवक श्री. सचिन दोडके
19. मांगडेवाडी – नगरसेवक श्री. प्रकाश कदम
20. भिलारेवाडी – नगरसेविका श्रीमती अमृता बाबर
21. गुजर निंबाळकरवाडी – नगरसेवक श्री. विशाल तांबे
22. जांभूळवाडी – नगरसेविका सौ. स्मिताताई कोंढरे
23. कोळेवाडी – नगरसेवक श्री. युवराज बेलदरे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.