Pune News: पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी शेजारी गेले अन् मार खाऊन परत आले

एमपीसी न्यूज – पती पत्नीचे भांडण सोडविणे शेजारच्या दाम्पत्यांना चांगलेच महागात पडले. पण आमच्या भांडणात मधी का पडता, असे म्हणत त्यांनाच मारहाण करण्यात आली. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी उर्मिला फड (वय 32) यांनी तक्रार दिली आहे. महेंद्र शिवराम कदम (वय 33) रवींद्र शिवराम कदम (वय 36) आणि सौरभ सुरेश जाधव (वय 20) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र कदम आणि तक्रारदार शेजारी शेजारी राहतात. शुक्रवारी सायंकाळी आरोपी महेंद्र कदम हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करु लागला.

त्यांचा वाद सोडवण्यासाठी फड दांपत्य गेले असता वरील आरोपींनी आमच्या कौटुंबिक भांडणात का पडता, असे म्हणत त्यांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.