Pune News : भटके, भिक्षेकऱ्यांचा रात्रनिवारा होणार सुरु !

 

एमपीसी न्यूज : शहातील उड्डाणपुल, उद्याने, बसस्टॉप आणि फुटपाथवर आसरा घेणाऱ्या निराधार, भटके, भिक्षेकऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या रात्रनिवारा (नाईट शेल्टर) नाईट हाऊस पुन्हा सुरू होणार आहेत.

पुणे महापालिकेच्या वतीने मानवतेच्या दृष्टीकोनातून शहरातील भिक्षेकरी, मानसिक रुग्ण, भटके, गरीब लोकांच्या रात्रीच्या निवाऱ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून रात्रनिवारा केंद्र उभारण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात हे रात्रनिवारा केंद्रे पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे शहराच्या सर्व चौक, फुटपाथ, उड्डाणपुलाखाली भिक्षेकरी, गरीबांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रात्रनिवारा केंद्रे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल म्हणाल्या, मानवतेच्या दृष्टीने शहरातील रात्रनिवारा केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायजेशन करून हे रात्रनिवारा खुले करण्यात येणार आहे. याठिकाणी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.