Pune News : ई-पास रद्द करण्याबाबत अद्याप राज्य सरकारचा कोणताही निर्णय नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज – ई-पास रद्द करण्याबाबत अद्याप राज्य सरकारचा कोणताही निर्णय नाही झाला नसून याबबात निर्णय व्हायचा आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात सांगितले. केंद्र सरकारने आंतरराज्य व राज्यांतर्गत वाहतुकीसाठी निर्बंध हटवण्याचे आदेश दिले आहेत मात्र राज्य सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात 800 बेडची क्षमता असलेल्या जम्बो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली असून रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकार्पण केले. त्यावेळी अजित पवार बोलत होते ते म्हणाले की, ई-पास रद्द करण्याबाबत अजून राज्य सरकारचा निर्णय व्हायचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा याबाबत माहिती देताना असे सांगितले की, केंद्र सरकारच्या आलेल्या पत्राची आम्ही दखल घेतली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.