Pune News : मराठा समाजाचे आरक्षण टिकू नये असे कोणत्याही सरकारला वाटणार नाही : अजित पवार

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकू नये, असे कोणत्याही सरकारला वाटणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 25 सप्टेंबर) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आश्चर्य वाटले. तामिळनाडू सरकारचे आरक्षण टिकले. तेथे दिलेल्या आरक्षणाला यापूर्वी कधीही स्थगिती दिली नाही. विधिमंडळात एक मताने निर्णय घेण्यात आला आहे.

विरोधी पक्ष, गटनेते, संघटना, मराठा क्रांती मोर्चा अनेकांशी आम्ही चर्चा केली आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकावे, यासाठी लार्ज बेंच समोर जावे लागत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांसंदर्भात विधेयक पास करण्याची एवढी घाई का होती, राज्यसभेत काय घडले ते आपल्याला माहितीच आहे. आज शेतकरी संघटनांचा आणि राजकीय पक्षांचे आंदोलन आहे. पण, महाराष्ट्रात याचे पडसाद दिसत नाही, अशी विचारणा अजित पवार यांना केली असता, महाराष्ट्रात आणखी काय करावे, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला.

_MPC_DIR_MPU_II

हे विधेयक राज्यात लागू न करणे, हा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भात कोर्टात गेले तर काय होईल, त्याचाही विचार करण्यात येत आहे. माथाडी कामगार, विविध संघटना यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. अंमलबजावणी करू नये, यासाठी ऑर्डर काढण्यात आली आहे. कोरोना संकट, शेतकरी संकट, बेरोजगारी, अर्थव्यवस्था ढासळली आहे. मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

तर, गणेशोत्सव काळात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले. त्यामुळे कोरोना वाढला. परिणामी सध्याच धार्मिक स्थळे उघडण्यासाठी घाई करणार नसल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोनाचे संकट अजूनही संपले नाही. त्यामुळे आगामी नवरात्रोत्सव गर्दी न करता शांततेत साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपण सकाळी सकाळी मेट्रोची पाहणी करण्यावर पवार यांनी आज खुलासा केला. सकाळी लोकांना त्रास होत नाही. सिग्नल नसतात. त्यामुळे याचा चुकीचा अर्थ काढू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात थांबलेले मेट्रोचे काम सध्या जोरात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.