Pune News : आता लॉकडाउन नको, कडक नियमच हवे : सदानंद शेट्टी  

पुण्यात दुसऱ्यांदा कोरोना लाट येण्याची भीती

एमपीसी न्यूज – पुण्यात मागील वर्षी म्हणजेच 9 मार्च 2020 कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर सर्वांचीच धावपळ उडाली. विदेशातून आल्यावरच हा रोग होत असल्याचा भ्रम पसरविण्यात आला.

प्रत्यक्षात झोपडपट्टीत हा रोग वाऱ्यासारखा पसरला. कॉमन टॉयलेट नको, त्यामुळे जंन्तु वाढवून नागरिकांना त्यांचा परिणाम जाणवतो, असे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्यावेळीच लक्षात आणून दिले. सातत्याने पाठपुरावा केला. तर, रात्रदिवस लॉकडाउन करून काहीही होत नाही. उलट हा रोग वाढण्याची भीती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी व्यक्त केली.

पुणे महापालिकेने कोरोनावर 300 कोटी रुपये खर्च केले. विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांना या रोगाची लागण झाली. तर, काही जणांचा मृत्यू झाला. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागासह सर्वच विभाग कार्यरत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाला तर मनपा अधिकारी – कर्मचारी स्वत: जबाबदारीने या या मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.