Pune News : पुण्यात लॉकडाऊनची गरज नाही, हायकोर्टाच्या निर्णयावर महापौरांची नाराजी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुण्यात कडक लॉकडाऊनचा विचार करण्यात यावा अशा सूचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्या होत्या. त्यावर आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली असून हायकोर्टाने सादर केलेली आकडेवारी आणि राज्य सरकार सांगत असलेली आकडेवारी यामध्ये तफावत असून या विरोधात आम्ही कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. पुण्यात कडक लॉकडाऊनचा विचार करावा अशा सूचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्या होत्या. त्यामुळे अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीत शहरात लॉकडाऊन घोषित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगत हायकोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मातीला आठवडाभरात सोळा हजाराचा संख्येने ऍक्टिव्ह रुग्ण कमी झाले आहेत. शहरात सध्या 39 हजार कोरोना रुग्ण असल्याची माहिती आहे. पण कोर्टात मात्र ती एक लाख दाखवली जात आहे. त्यामुळे ही नेमकी तफावत कशी याबद्दल माहिती मिळणे आवश्यक असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.