Pune News : ‘पडळकरांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही,  त्यांना महत्व देऊ नका’

अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका

एमपीसी न्यूज : गोपीचंद पडळकरांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची तुम्ही का एवढी दखल घेत आहात? उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा आहे का ? असा सवाल करीत प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय आणि तुम्ही अगदी पत्रकार परिषदेत मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारत आहात. लोकांनीच त्यांना नाकारलं आहे, तुम्ही फार महत्व द्यायचं कारण नाही, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

जेजूरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्याविरोधात गोपीचंद पडळकर टीका केली आहे.

ते म्हणाले, शरद पवारांसारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचं पडळकर यांनी सांगितलं आहे.

आहिल्याबाईंचं काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होतं. त्यामुळे पवारांच्या हस्ते पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये. म्हणून आम्ही गनिमी काव्यानं जाऊन पुतळ्याचं अनावरण केल्याचंही पडळकर म्हणाले आहेत.

पडळकरांच्या या वक्तवावर प्रत्त्युत्तर देताना अजित पवार यांनी पडळकर यांना किरकोळीत काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.