Pune news : धर्मांमध्ये कोणीही राजकारण आणू नये – रवींद्र धंगेकर

आमदार रविंद्र धंगेकर यांनी उभारली गुढी

एमपीसी न्यूज-कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाल्यानंतर (Pune news)  त्यांचा पाहिलाच गुढीपाडवा हा सण आहे.हा सण त्यांनी कुटुंबीयासोबत आज साजरा केला .

 

 

यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की,मी राजकीय जीवनात 30 वर्षापासुन असून हा सण समाजातील प्रत्येक वर्गा सोबत साजरा करीत आलो आहे.त्यामुळे आमदार झालो असलो तरी मी एका कार्यकर्त्यां प्रमाणे सण साजरा करित आहे.तसेच गुढी पाडवा सणाच्या निमित्ताने दरवर्षी एक संकल्प करीत असतो.त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील 500 स्क्वेअर फुटाच्या मिळकतीना राज्य सरकार सवलत देईल हीच अपेक्षा आहे.

 

 

Nigdi News : निगडी येथील यमुना नगरमध्ये गुढीपाडवा निमित्त शोभयात्रा

 

जर त्यांनी सवलत दिली नाही,तर या विरोधात रस्त्यावर उतरून लढा उभारला जाईल ,असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.तसेच आज आपण कोणताही सण साजरा करताना.धर्मांमध्ये कोणीही राजकारण आणू नये.तसेच इतर धर्माचा कोणीही द्वेष करू नये.अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

 

तसेच ते पुढे म्हणाले की, विधिमंडळात जाण्याची पाहिलीच वेळ असल्याने आणि राज्यातील अनेक मोठे नेते आजवर टीव्ही किंवा प्रचारा निमित्त पाहिले होते. त्यामुळे एक सभागृहा बाबत दडपण होते.मात्र सर्व नेतेमंडळी सभागृहातील कामकाजा बाबत माहिती दिली.त्यामुळे एक धीर आला आणि त्यानंतर काल पहिलेच भाषण करून पुणेकर नागरिकांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्याच त्यांनी सांगितले.तसेच राजकीय जीवनात कोणीच कायमचा विरोधक नसतो.एक दिवसापुरत राजकारण असते.त्यामुळे माझ्या राजकीय जीवनातील सर्वाना गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा (Pune news) असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.