Pune News : चोवीस तास पाणी पुरवठा कामात अडथळे आणणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही : गिरीष बापट

 महापालिकेच्या 24 बाय 7 पाणी पुरवठा कामाला गती देण्यासाठी मी वैयक्तिक लक्ष देणार

एमपीसी न्यूज : पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 24×7 समान पाणी पुरवठा योजना राबवली जात आहे. परंतु ही कामेे करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना पाईपलाईन, मीटर टाकणे आणि साठवण टाक्या बांधण्याच्या कामांमध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून अडथळे निर्माण केले जात असल्याच्या तक्रारी आल्या आाहेत. पाणी पुरवठा कामात अडथळे आणणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सूचक इशारा पुणे लोकसभेचे खासदार गिरिष बापट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

शहरातील नियोजित योजना, त्यांची अंमलबजावणी आणि नवे नियोजन या अनुषंगाने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

खा. बापट यावेळी म्हणाले, “पुणेकरांना दिलेली आश्वासने पुढील काही वर्षात पूर्ण करू. कोरोनामुळे ठप्प झालेल्या समान पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात येणार आहे. या योजनेतून 82 साठवण टाक्या बांधणार आहेत. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी 700 किलोमीटरचे काम अपेक्षित होते. परंतु 300 किलोमीटरचे कामच आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे.

पाण्याचे मीटरही बसविण्यात येत असून, सध्या फक्त 8 टक्के मीटरचे काम झाले आहे. परंतु या कामांमध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून संबंधित कंपन्याच्या ठेकेदारांना धमकाविणे, पैसे मागून अडथळे आणले जात असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. परंतु यामध्ये कोणीचीही गय केली जाणार नाही, मग तो लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो,” असा सज्जड दम खा. बापट यावेळी भरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.