Pune News : मराठा स्त्री मुख्यमंत्री बद्दलच्या ‘त्या’ विधानाचा राजकीय अर्थ नको : आशिष शेलार

एमपीसी न्यूज : विजय चोरमारे लिखीत ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रीया’ पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्यावर ‘मराठा स्त्री मुख्यमंत्री झाल्यास माझा पाठिंबा असेल,’ हे माझे वक्तव्य त्या कार्यक्रमापुरतेच मर्यादित होते. भविष्यात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असे घुमजाव भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात आले होते.

शेलार म्हणाले, मराठा स्त्री मुख्यमंत्री पदासंदर्भातील माझे वक्तव्य हे त्या पुस्तकावर ते भाष्य होते, त्यामध्ये कोणतेही राजकीय अर्थ लावू नये.

शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं गेलयं. सर्वांशी चर्चा करून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला पाहीजे. राज्यसरकार म्हणतायत स्थानिक प्रशासनाची ही जबाबदारी आहे. सरकारने शाळा उघडण्यासाठी सर्वांसोबत चर्चा का करत नाही.

आम्ही सत्तेत असतो, मी जर शिक्षणमंत्री असतो तर सर्वांशी चर्चा केली असती. जरी आम्ही शाळा उघडण्यासाठी आंदोलन करु शकत नसलो तरी शाळा उघडण्यासाठी आम्ही आग्रही आहोत,

राज्यपालांना लेखी अल्टिमेटम देण्याची सरकारची पद्धत कुठली. राज्यपाल पदाला सन्मान दिलाच पाहीजे. वीजबिलाच्या 67 हजार कोटींच्या थकबाकीची चौकशी झालीच पाहीजे.

मुळात केजरीवाल यांच्या मोफत वीजेच्या घोषणेनंतर नितीन राऊत यांनी शंभर युनिट मोफत देण्याची घोषणा केली होती त्याचं काय झालं. ताळेबंदांचा अभ्यास न करताच घोषणा का केली. जनतेला गृहित धरून घोषणा करता का, विश्वासघात का केला.

45 लाख शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सरकारने केलं हे देखील चौकशी झाली पाहीजे. गतवर्षीच्या बिलावर आधारीत बिले दिली गेली, त्यावेळी बाजारपेठा उघड्या होत्या. सध्या बाजार बंद असताना बिले का दिली.

वाढीव बिले सुधारा, शंभर युनिट मोफत सवलत दिली पाहीजे, यासाठी भाजपा उद्यापासून रस्त्यावर आंदोलन करणार आहोत, अशी माहिती शेलार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.