Pune News : लस संपली, पुण्यात उद्या लसीकरण नाही

एमपीसी न्यूज – महापालिकेकडे कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसीचे डोस संपले असून, शासनाकडून नव्याने लस पुरवठा करण्यात आलेला नसल्याने उद्या (सोमवारी) शहरातील सर्व लसीकरण मोहीम बंद असणार आहे.

गेल्या आठवड्यात महापालिकेला शासनाकडून मिळालेले कोव्हीशील्ड लसीचे 28 हजार डोस शुक्रवारीच संपले आहेत. तर 3 हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध असल्याने त्याचे शनिवारी आणि रविवारी नियोजन केले आहे. ही लस आज संपली आहे.

लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन जाहीर केले जाईल, असे महापालिकेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.