Pune News: संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणी नाही; शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

पर्वती, वडगांव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर या जलकेंद्रावरील पंपिंग आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

एमपीसी न्यूज – अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि.10) पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी (दि.11) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पर्वती, वडगांव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर या जलकेंद्रावरील पंपिंग आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, सहकारनगर, सातारा रोड, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणे, कोथरूड, पद्मावती टँकर भरणा केंद्र, हिंगणे, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, गोखलेनगर.

जनवाडी, बावधन, बाणेर, पुणे विद्यापीठ, वारजे – माळवाडी, अहिरेगाव, सुस, सुतारवाडी, भुगाव, लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महम्मदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, नगर रस्ता, कल्याणीनगर.

वडगांवशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, सातववाडी, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर परिसरात गुरुवारी पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.