Pune News : शहरातील 88 रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णांना मिळणार वैद्यकीय उपचार !

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे शहरातील महापालिकेच्या जम्बो कोविड केयर सेंटरसह सर्व खासगी रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णांना प्रवेश देणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरोना महामारीच्या काळात जम्बो कोविड केयर सेंटरसह महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णांना वैद्यकीय उपचार दिले जात नव्हते. कोरोनामुळे मोठ्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यावेळी हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, मेंंदूविकार, नेत्र, दंत शस्त्रक्रिया केल्या जात नव्हत्या.

कोरोनाच्या भितीमुळे नागरीक शस्त्रक्रियेसह वैद्यकीय उपचार घ्यायला देखील घाबरत होते. त्यामुळे अनेक रुग्णांनी घरातच उपचार घेत आजार अंगावर काढले. परंतु, कोरोनाच्या काळात अत्यावश्यक उपाचारा अभावी काही नॉन कोविड रुग्णांना जीव देखील गमवावा लागला होता.

आता नोव्हेंबरमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील घटू लागली आहे. तसेच कोरोनासाठी आरक्षित ठेवलेल्या खाटा रिकाम्या राहात आहेत. पुण्यात सध्या साडे बारा हजार खाटा रिक्त आहे.

त्यामुळे नॉन कोविड रुग्णांना सर्व 88 रुग्णालयांमध्ये प्रवेश देण्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे त्रस्त नॉन कोविड रुग्णांना उपचार मिळू शकेल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III