_MPC_DIR_MPU_III

Pune News : महिला गुन्ह्यासंदर्भात हलगर्जीपणा नको, पोलिस आयुक्तांच्या बैठकीत अधिका-यांना सूचना

एमपीसीन्यूज : शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित राखण्यासाठी अधिका-यांनी प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः महिला छेडछाडीसह गुन्ह्यासंदर्भात अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात सर्व अधिका-यांनी कटाक्षाने कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली आहे. आयुक्तालयात आज पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

शहरातील आणि बाहेरुन बदलून आलेल्या वरिष्ठ अधिका-यांमध्ये दुवा साधण्यासाठी आज पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. बैठकीत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना प्रत्येक झोन नुसार कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

_MPC_DIR_MPU_II

पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या टोळ्या, गँगवार, महिला छेडछाड, चेन स्नॅचिंग विषयावर चर्चा करण्यात आली. हद्दीतील गँगवारांची इत्भूंत माहिती काढून कारवाई करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचित करण्यात आले आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधिका-यांनी प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

हद्दीतील छोट्या मोठ्या घटनांवर कारवाईचा बडगा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही दिवसांपासून शहरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य करुन चेन स्नॅचिंगमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्यासाठी पथकांनी दक्ष राहून कारवाई करण्यासाठी स्पष्ट शब्दात सूचित करण्यात आले.  विशेषतः सायंकाळच्या वेळेत पथकांनी विशेष लक्ष दिल्यास घडणा-या घटनांना आळा बसण्यास मदत होईल असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.