Pune News : कोरोनाची वाढीव बिले देणाऱ्या दोषी रुग्णालयांना नोटीस ; महापालिकेचा दणका !

एमपीसी न्यूज : महापािलकेच्या आराेग्य विभागाने केलेल्या बिल पडताळणीत काेराेनामुक्त झालेल्या अकरा जणांना वाढीव बिलाचे पैसे परत मिळाले आहे. वाढीव बिलाच्या दहा तक्रारीसंदर्भात संबंधित दोषी रुग्णालयांनाही नाेटीस पाठविण्यात आल्या आहेत.

काेराेनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयांकडून वाढीव दराने बिल आकारणी केली जात हाेती. त्यावेळी राज्य सरकारने उपचाराच्या खर्चाबाबतची नियमावली जाहीर केली हाेती. या नियमावलीनुसारच बिलांची आकारणी करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या बिलांची तपासणी करण्याचे काम महापािलकेकडून केले जात आहे.

महापािलकेकडे वाढीव बिलाच्या संदर्भात 168 तक्रारी आल्या हाेत्या. त्याची पडताळणी केली जात आहे. त्यानुसार महापािलकेने बिलांची पडताळणी सुरू केली. आत्तापर्यंत अकरा रुग्णांना वाढीव बिलाचे पैसे परत देण्यात आले आहे. संबंधित रुग्णांना एकूण 12 लाख 62 हजार 883 रुपये रुग्णालयाकडून दिले गेल्याची माहीती सहाय्यक आराेग्य प्रमुख डाॅ. मनिषा नाईक यांनी दिली.

या अकरा बिलांची एकुण रक्कम 38 लाख 92 हजार 354 रुपये इतकी हाेती. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार या बिलांची एकुण रक्कम 26 लाख 39 हजार 223 रुपये इतकी आली. वाढीव रक्कम संबंधित रुग्णांना परत द्या असे आदेश महापािलकेने रुग्णालयांना दिले हाेते. आत्तापर्यंत महापालिकेने वाढीव बिलाच्या तक्रारीपैंकी 40हून अधिक तक्रारींचा निपटारा केला आहे. यामध्ये संबंधित रुग्णांनी विमा याेजनेचा लाभ घेतला हाेता, तसेच काही रुग्णांना काेराेनाची लागण झालेली नव्हती अशा कारणांमुळे या तक्रारी निकाली काढल्या गेल्या आहेत. वाढीव बिलांच्या संदर्भात आलेल्या तक्रारीनुसार संबंधित रुग्णालयांना नाेटीस पाठविण्याचे काम सुरु आहे, अशी माहीती डाॅ. नाईक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.