Pune News: आता Pmpml मध्ये 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवेश

पीएमपीएमएल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऐच्छिकस्थळी प्रवास करण्यासाठी नागरिकांना लाभ होत आहे.

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलमध्ये आता 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश मिळणार आहे. मुंबईत बेस्टने घेतलेल्या धर्तीवर पीएमपीएमएलने ही ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने मागील 5 ते 6 महिन्यापासून पीएमपीएमएल बंद होती.

मात्र, दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या बसेसमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. पीएमपीएमएल सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ब्रेकडाऊन होत आहेत. त्याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे.

तर, डेपो व पार्किंगच्या जागा व्यापारी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत 14 डेपो आहेत. त्यांचे एकूण क्षेत्र 60 एकरच्या आसपास आहे. बस पार्किंगसाठी 15 ठिकाणी जागा उपलब्ध आहे.

आता पीएमपीएमएलच्या मिळकतीचे विकसन करताना 0.5 एफएसआय पीएमपीसाठी आणि एक एफएसआय व्यापारी आस्थापनेसाठी दिला जातो. त्यामध्ये वाढ करून अडीच एफएसआय मिळवा, असा प्रस्ताव प्रशासनाने राज्य शासनाकडे दिला आहे.

दरम्यान, पीएमपीएमएल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऐच्छिकस्थळी प्रवास करण्यासाठी नागरिकांना लाभ होत आहे. आता 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.