Pune News : ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा होणार सन्मान

एमपीसी न्यूज – टोकियो येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणा-या सहा खेळाडुंचा आणि भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडुंचा पुणे महापालिकेतर्फे अभिनंदन करण्यात येणार आहे.

तसेच भाला फेकमध्ये सुवर्ण पदक पटकाविलेल्या हरियाणातील नीरज चोप्रा याला मानपत्र आणि आर्थिक सहाय्य करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नगरसेवक महेश वाबळे आणि राहूल भंडारे यांनी याविषयीचा प्रस्ताव ठेवला होता.

महापालिकेच्या नवीन इमारतीत प्राथमिक उपचारांसाठी यंत्रणा

पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीत प्राथमिक उपचार करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचा-यांसाठी आवश्यक यंत्रणा विकसित करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘दररोज कार्यालयीन वेळेत महापालिकेत सुमारे चार हजार कर्मचारी कार्यरत असतात. त्याच प्रमाणे दररोज सरासरी पाच हजार नागरिक महापालिकेत कामानिमित्त येत असतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी प्राथमिक उपचार आणि आपत्कालिन परिस्थितीत उपचार करता यावेत यासाठी ही प्राथमिक आरोग्य यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.