Pune News : ओम दत्तश्री ठाकूर महाराज (श्रीक्षेत्र गाणगापूर) यांचे निधन

एमपीसी न्यूज –  ओम दत्तश्री ठाकूर महाराज (श्रीक्षेत्र गाणगापूर) यांचे आज सायंकाळी दीर्घ आजाराने देहावसन झाले. त्यांचे वय 80 वर्षे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंड असा परिवार आहे.

_MPC_DIR_MPU_II

ठाकूर महाराज याचे धार्मिक व सामाजिक कार्यात मोठे योगदान होते. मुंबई, गाणगापूर, देहू, उरण यासह राज्यातील अनेक भागांत त्यांचे सेवाकार्य मोठे होते. देशभरात त्यांचे हजारो अनुयायी आहे. धार्मिक विषयावर त्यांनी अनेक ग्रंथ व भजने लिहिले आहेत. प्रपंच करून परमार्थ करावा ही त्यांची शिकवण होती.

ठाकूर महाराज यांच्या निधनामुळे ओम दत्त परिवारातील असंख्य अनुयायांनी हळहळ व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.