Pune news : पहिल्या दिवशी 34,443 प्रवाशांनी केला ‘पीएमपीएमएल’ने प्रवास

काल, गुरुवारी दिवसभरात 477 बसेसनी 190 मार्गावर जवळपास 2,548 फे-या मारल्या.

एमपीसी न्यूज – तब्बल पाच महिन्याच्या प्रवासी वाहतूक बंदीनंतर ‘पीएमपीएमएल’ने 3 सप्टेंबर पासून पुन्हा बस सेवा सुरू केली. पहिल्याच दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील 34,443 प्रवाशांनी या बसेसमधून प्रवास केला. काल, गुरुवारी दिवसभरात 477 बसेसनी 190 मार्गावर जवळपास 2,548 फे-या मारल्या.

कोरोना विषाणूंचा संसर्ग देशात पाय पसरू लागला आणि देशासह राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. ‘पीएमपीएमएल’ने 25 मार्चपासून आपली प्रवासी वाहतूक बंद केली.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी 3 सप्टेंबर पासून पीएमपीएलची सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाने घोषणा केली. त्यानुसार गुरुवारी 447 बसेस 190 मार्गावर सोडण्यात आल्या.

काल दिवसभरात 477 बसेसनी 190 मार्गावर जवळपास 2,548 फे-या मारल्या. पहिल्याच दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील 34,443 प्रवाशांनी या बसेस मधून प्रवास केला. ‘पीएमपीएमएल’ने सुरक्षेची सर्व काळजी घेत प्रवासी वाहतूक सुरू केली आहे.

बसचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जात असून बसं मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तापमान तपासल्या नंतरच त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. बस मध्ये झिगझॅग पद्धतीने आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.